श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या दोन जागांसाठी लागली निवडणूक

सोलापूर : दोन जागांवरील उमेदवारांनी माघार न घेतल्याने सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची २०२३-२४ ते २०२८-२९ पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत माळशिरस उत्पादक गटातून मिलिंद कुलकर्णी, सुरेश पाटील, महादेव शिंदे व गोपाळ गोरे तर इस्लामपूर उत्पादक गटातून बाळासाहेब माने, दत्तात्रय रणवरे, कुमार पाटील, उत्तम बाबर हे उमेदवार रिंगणात आहेत. विरोधी गटातर्फे माळशिरस गटातून गोपाळ गोरे व इस्लामपूर गटातून उत्तम बाबर यांचे उमेदवारी अर्ज राहिले.

संचालक मंडळासाठी दि. २५ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून दि. २६ रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर केला जाईल. कारखान्यातील इतर शिल्लक अर्जांमध्ये मालोजीराव देशमुख, सुधाकर पोळ, प्रफुल्ल कुलकर्णी, सदाशिव वाघमोडे-पाटील, शिवाजी गोरे, रणजीत पाटील, दत्तात्रय मिसाळ, सचिन लोकरे, बलभीम पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, अर्जुन धाईंजे, लीलावती देवकर, लीलावती खराडे, रामदास कर्णे आणि सुनील माने या २३ उमेदवारांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here