भोगावती कारखान्याकडून शेतकऱ्यांना २१ कोटींचे ऊस बिल अदा : अध्यक्ष प्रा. पाटील

कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याने कारखान्याने ८१ दिवसांत ३,६३,३३० टन उसाचे गाळप करून ४,३८,०९० पोती साखर उत्पादित केली. सरासरी साखर उतारा १२.१३ टक्के एवढा आहे. कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील १ ते १५ जानेवारीअखेरच्या पंधरवड्यातील ऊस बिल प्रतीटन ३,२०० रुपयांप्रमाणे २१ कोटी ७९ लाख रुपये ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली.

कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील उसासाठी प्रतिटन ३२०० रुपये ऊस दर जाहीर केला होता. या पंधरवड्यात गाळप झालेल्या ६८,११२ मेट्रिक टन उसाची २१ कोटी ७९ लाख ५८९६५ रुपयांची रक्कम संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष पाटील व उपाध्यक्ष कवडे यांनी केले. यावेळी सर्व संचालक, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here