अमित शाह यांनी दमण आणि दीवमध्ये सिल्वासा येथे सुमारे 2448 कोटी रुपयांच्या विविध 53 प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी, लाभार्थी संमेलनाला केले संबोधित

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमीत शाह यांनी आज दमण आणि दीवमध्ये सिल्वासा येथे सुमारे 2448 कोटी रुपयांच्या विविध 53 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली आणि लाभार्थी संमेलनाला संबोधित केले.

वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करून गृहमंत्री अमीत शाह यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, वीर सावरकर यांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी आणि देशाला योग्य मार्ग दाखविण्यासाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. वीर सावरकर यांच्यासारख्या महान व्यक्ती हजार वर्षांत एकदाच जन्माला येतात असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत देशातील सुमारे 100 कोटी जनता आपला मतदानाचा हक्क बजावेल आणि नवीन सरकार निवडेल. ते म्हणाले की, मोदीजींची गॅरंटी म्हणजेच एखादे काम 100 टक्के पूर्ण करण्याचे आश्वासन. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोट्यवधी दलित, आदिवासी, गरीब आणि वंचित लोकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अमित शाह म्हणाले की, आता देशात लवकरच निवडणुका होणार आहेत, तेव्हा देशातील जनतेसमोर दोन पर्याय आहेत. एक म्हणजे नरेंद्र मोदी यांचे देशभक्तीने परिपूर्ण नेतृत्व आणि दुसरे, सात घराणेशाही पक्षांची आघाडी. आपल्याला भारताला जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणाऱ्या मोदी यांची राजवट हवी आहे, की बारा लाख कोटी रुपयांचे घोटाळे करणाऱ्यांची, हे देशातील जनतेने ठरवायचे आहे, असे ते म्हणाले.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here