ओंकार शुगर-फराळेकडून ऊस बिले अदा : चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील ओंकार शुगर ॲण्ड डिस्टीलरी पॉवर प्रा. लि, फराळे युनिट क्रमांक तीनच्यावतीने शेतकऱ्यांना १ ते १५ फेब्रुवारी अखेरपर्यंतची ऊस बिले संबंधीतांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहेत. कारखान्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांनी ही माहिती दिली.

चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांनी सांगितले की, कारखान्याने २८ फेब्रुवारी रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रती टन ३,३०० रुपये दराने ऊस बिले जमा केली आहेत. यावेळी जनरल मॅनेजर शत्रुघ्न पाटील, टेक्निकल विभागाचे सरव्यवस्थापक आर. आर. देसाई, चिफ केमिस्ट दिलीप बरगे, मुख्य शेती अधिकारी समीरकुमार व्हरकट, चिफ अकाउंटंट शरद पाटील, केनयार्ड सुपरवायझर राहुल यादव, स्टोअर किपर रोहित जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here