कोल्हापूर : आसुर्ले पोर्ले (ता. पन्हाळा) येथील श्री दत्त दालमिया भारत शुगर साखर कारखान्याने १५ फेब्रुवारीपर्यंत गाळपास आलेल्या उसाची बिले ऊस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहेत. १५ फेब्रुवारीपर्यंत ऊसतोडणी ओढणी कंत्राटदारांची बिलेदेखील जमा करण्यात आली आहेत, असे युनिट हेड रंगाप्रसाद यांनी सांगितले.
रंगाप्रसाद म्हणाले की, कारखान्याने ११२ दिवसांत ८ लाख ९२ हजार २४० मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. कंपनीने गळीत हंगामात दत्त दालमिया साखर कारखान्याने ११२ दिवसांत ८ लाख ९२ हजार २४० मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे. प्रतिदिनी १३.०७ टक्के सरासरी साखर उतारा असून, ११ लाख ४३ हजार ६३५ मेट्रिक टन साखर उत्पादित झाली आहे.