सोलापूर : पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर ५३ व्या राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी ४ ते ११ मार्च या कालावधीत राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात वर्क्स मॅनेजर अविनाश ढेकाणे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन केले. कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षेचे महत्व पटवून देत सविस्तर माहिती दिली.
सुरक्षा ऑफिसर महेश देशमुख व सुरक्षा अधिकारी दिगंबर जगताप यांनी कारखान्यातील कामगारांना सुरक्षिततेची शपथ दिली. प्रोसेस विभागाचे जनरल मॅनेजर पोपट येलपले, चिफ इंजिनिअर संजय कैचे, डिस्टीलरी मॅनेजर पांडूरंग बागल, चिफ केमिस्ट अनिल जगताप, दत्ता देसाई, रफिक आतार, सुनिल शिंदे, सचिन चौगुले आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.