बेळगाव : शिवशक्ती शुगर्सने गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच २० लाखांपेक्षा अधिक टन उसाचे गाळप करून विक्रम केला आहे. यंदा ऊस गाळप हंगामासमोर अनेक संकटे असताना ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार, तोडणी कामगार व कारखान्याचे कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले, असे प्रतिपादन शिवशक्ती शुगर्सचे संचालक व केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले. बुवाची सौंदत्तीतील शिवशक्ती शुगर्सच्या गाळप हंगाम सांगता समारंभ नुकताच झाला. त्यावेळी ते बोलत होते.
कार्याध्यक्ष कोरे म्हणाले की, शेतकऱ्यांनी गाळप हंगामासाठी विक्रमी उसाचा पुरवठा करुन संपूर्ण देशात गाळपामध्ये द्वितीय क्रमांक व राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. कारखान्याला तांत्रिक विभागातून राज्यातील प्रथम क्रमांकाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. जे. कृष्णन, आ. दुर्योधन ऐहोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यवस्थापकीय संचालिका आशा कोरे, चिदानंद कोरे, कारखान्याचे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे, संचालक भरतेश बनवणे, अजित देसाई, अण्णासाहेब इंगळे, चेतन पाटील, संदीप पाटील, महावीर कात्राळे, मल्लाप्पा म्हैशाळे, शिवशक्ती कारखान्याचे कार्यालय प्रमुख बी. ए. पाटील, जे. कृष्णन, एन. एस. मुल्ला, सुरेश पाटील, विजय पाटील, विकास अधिकारी राघवेंद्र पवार उपस्थित होते.