छत्रपती संभाजीनगर : सिध्देश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, बुधवारी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. सिल्लोड व शिवणा गटातून ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने या गटातील प्रत्येकी ३- ३ असे ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले. यापूर्वी छाननीत अर्ज अवैध ठरल्याने घाटनांद्रा व भोकरदन गटातील प्रत्येकी ३- ३ असे ६ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहे. आता ९ जागांसाठी १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.
बिनविरोध निवडून आलेले सर्व १२ उमेदवार हे भाजपचे आहेत. यामध्ये सिल्लोड गट- ज्ञानेश्वर मोठे, किरण पवार, सलीमखाँ मुलतानी. शिवणा गट- रामदास हिवाळे, दीपक अपार, आबासाहेब जंजाळ. घाटनांद्रा गट- शंकरराव माने, भाजपचे दिलीप दाणेकर, काकासाहेब फरकाडे. भोकरदन गट- सुभाष सपकाळ, आप्पासाहेब साखरे, प्रभाकर इंगळे यांचा समावेश आहे. कारखान्यासाठी १७ मार्चला मतदान तर १८ मार्चला मतमोजणी होणार आहे. छाननीत २९ अर्ज अवैध झाल्याने १५ जागांसाठी ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. बुधवारी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.