हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
कोल्हापूर, ता.28 ; देशात भाजपला एक हाती सत्ता मिळाली आहे. 30 मे रोजी पंतप्रधान शपथ घेतिल. त्यानंतर साखर कारखान्याना बळकटी देण्यासाठी ईथेनॉल ची निर्मिती आणि वापर यावर काम केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
देशात सध्या एकूण ५६२ साखर कारखाने आहेत. यापैकी 150 कारखाने इथेनॉल निर्मिती करतात. त्यामुळे इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
देशातील ३१३ कोटी लिटर मागणी असून उत्पादन मात्र १६५ कोटी लिटर आहे. मागणी आणि पुरवठा यांचा समतोल साधण्यासाठी इथेनॉल निर्मिती वर भर दिला जाणार आहे.
बाजारात सध्या ५९.५० रुपये प्रतिलिटर दर आहे. याच दरानेच ईथेनॉल निर्मिती करावी आणि साखर कारखान्यांना बळ द्यावे हाच शासनाचा उद्देश असणार आहे. इथेनॉल निर्मितीकडे वळलेल्या साखर कारखान्यांमुळे शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देता येणार आहे, अशी गणित मांडण्यात आलेले आहे.