सांगली : क्षारपड जमिनीची टप्प्या-टप्प्याने सुधारणा करून राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उसाचे एकरी उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी केले. राजारामबापू कारखान्याच्यावतीने बुर्ली येथे आयोजित समृद्ध भूमी अभियान सभेत ते बोलत होते. यावेळी जमिनीचे माती परीक्षण, पिकास खतांचे नियोजन याची माहिती ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांनी दिली. सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली योजनेची सविस्तर माहिती जलसिंचन अधिकारी जे. बी. पाटील यांनी दिली.
यावेळी प्रमोद पवार यांनी स्वागत केले. कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, शेती समितीचे अध्यक्ष उपसरपंच उमेश पाटील, विठ्ठल पाटील, प्रमोद मिठारी, सोसायटीचे अध्यक्ष सुरेश मिठारी, प्रकाश पाटील, निवृत्ती पाटील, नागेश पाटील, शीतल सावर्डे, बाळासाहेब मिठारी, भानुदास काळे आदींसह सभासद, शेतकरी यावेळी उपस्थित होते.