पांडुरंग साखर कारखान्यात ९.७ मेगावॅट टर्बाइनचे उद्घाटन

सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात नव्याने उभारलेल्या को-जनरशेनच्या ९.७ मेगावॅट प्रकल्पाच्या टर्बाइनचे उद्घाटन चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या हस्ते झाले. यंदाच्या हंगामात कारखान्याने १३० दिवसांत ९ लाख ४४ हजार २५० मे. टन उसाचे गाळप करून ११.२३ टक्के उताऱ्याने १० लाख ११ हजार १११ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखाना यंदाच्या आपल्या १० लाख मे. टन या उद्दिष्टापेक्षाही अधिक ऊस गाळप करेल असे प्रतिपादन चेअरमन परिचारक यांनी यावेळी केले.

कारखान्यात चालू गळीत हंगाम २०२३ २४ मध्ये उत्पादित झालेल्या १० लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्यांचे पूजन यावेळी चेअरमन परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. कारखाना गाळपास येणाऱ्या उसाला चांगला दर देत आहे. विस्तारीकरणामुळे प्रती दिन ८ हजार मे. टनापर्यंत ऊस गाळप सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्हा. चेअरमन कैलास खुळे, संचालक दिनकर मोरे, वसंतनाना देशमुख, दिलीप चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here