कागलच्या शाहू कारखान्यात सल्फरमुक्त साखरेचे उत्पादन

कोल्हापूर : येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने साखर उद्योगात नवे प्रकल्प राबविले आहेत. साखर उद्योगातील बदलती परिस्थिती व बाजारपेठेत सल्फरमुक्त साखरेची होत असलेली मागणी विचारात घेऊन कारखाना व्यवस्थापनाने सल्फरलेस साखरनिर्मिती प्रकल्पाचा प्रारंभ केला आहे. या नव्याने उत्पादित केलेल्या सल्फरमुक्त साखरेच्या पहिल्या पाच पोत्यांचे पूजन ‘शाहू ग्रुप’चे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले.

छत्रपती शाहू साखर कारखान्याने कालानुरूप आपल्या उत्पादनांमध्ये बदल घडवून आणले आहेत. त्यातूनच सल्फरलेस साखर निर्मितीला यंदापासून सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला उत्पादित करण्यात आलेली ही साखर ग्रामदैवत गहिनीनाथ गैबी पीर, लक्ष्मी देवी व विविध देवतांना ही साखर अर्पण करण्यात आली. यावेळी कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, रेखा पाटील, सुजाता तोरस्कर, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह संचालक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here