लोकसभा निवडणूक 2024 : 19 एप्रिल रोजी मतदान सुरू होणार, 4 जून रोजी मतमोजणी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात होणार असल्याची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी केली. पोटनिवडणूक, चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि सार्वत्रिक निवडणुकांसह सर्व निवडणुकांची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. विद्यमान सरकारचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे. मागील लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक भारतीय निवडणूक आयोगाने ने 10 मार्च रोजी जाहीर केले होते आणि 11 एप्रिल रोजी देशभरात सात टप्प्यांत मतदान झाले होते. 23 मे रोजी मतमोजणी झाली होती.

 

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले कि, 12 लाखांहून अधिक मतदान केंद्रांवर 96.8 कोटी मतदार आगामी निवडणुकीत मतदान करण्यास पात्र आहेत. 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची परवानगी दिली जाईल. सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे अशा किमान मूलभूत सुविधा पुरविल्या जातील. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार आहे. या कालावधीत 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या एकूण 102 जागांवर मतदान होणार आहे.

 

26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात देशातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होणार आहे. यादरम्यान देशातील 89 लोकसभा जागांवर निवडणूक होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची निवडणूक होणार आहे. राज्यांमधील लोकसभेच्या 94 जागांवर मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे.

 

चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. या दरम्यान देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे.  8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 49 जागांवर मतदान होणार आहे. सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी मतदान होणार आहे.या दिवशी देशातील सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 57 लोकसभेच्या जागांवर मतदान होणार आहे. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. शेवटच्या टप्प्यात 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान होणार आहे. मतदान होणार आहे. या कालावधीत लोकसभेच्या 57 जागांवर मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here