सोनहिरा कारखान्याच्या व्हा. चेअरमनपदी पुरुषोत्तम भोसले यांची बिनविरोध निवड

सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या व्हा. चेअरमनपदी पुरुषोत्तम भोसले यांची बिनविरोध निवड झाली. कोल्हापूर उपविभागाचे प्रादेशिक साखर उपसंचालक गोपाळ मावळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार मोहनराव कदम (दादा) प्रमुख उपस्थित होते. भोसले हे गेली १९ वर्षे झाले कारखान्याचे संचालक आहेत.

जालिंदर महाडिक यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त झाले होते. रघुनाथराव कदम यांनी भोसले यांचे नाव सुचवले. त्याला भीमराव मोहिते यांनी अनुमोदन दिले. नूतन व्हा. चेअरमन पुरुषोत्तम भोसले म्हणाले की, चेअरमन मोहनराव कदम व आमदार विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज उत्तम करू. संचालक जालिंदर महाडिक, सयाजी धनवडे, पोपटराव महिंद, पंढरीनाथ घाडगे, दिलीपराव सूर्यवंशी, तानाजीराव शिंदे, जगन्नाथ माळी, शिवाजी गढळे, शिवाजी काळेबाग, शारदा कदम, कार्यकारी संचालक एस. एफ. कदम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here