महाराष्ट्रातील १३ साखर कारखान्यांना मिळणार १८९८ कोटींची कर्जहमी

पुणे / नवी दिल्ली : राज्यातील आर्थीक अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने १३ सहकारी साखर कारखान्यांना १८९८ कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लाभार्थी साखर कारखानदारांच्या यादीवर नजर टाकळी तर असे लक्षत येते कि, हे सर्व साखर कारखानदार भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाचे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साखर कारखानदारांना आर्थिक ‘बुस्टर डोस’ देण्याचा निर्णय कितपत फायदेशीर ठरतो, हे निवडणूक निकालानंतर समजणार आहे.

‘ॲग्रोवन’ने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारने स्वत:च्या जबाबदारीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून कर्ज घेऊन साखर कारखान्यांना देणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे आचारसंहिता लागू होण्याच्या आधी मंत्रीमंडळाच्या उपसमितीने या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती आहे. कर्जहमीचा प्रस्ताव एनसीडीसीला पाठविण्यात आला असून त्यांची मान्यता मिळताच कर्जाची रक्कम सरकारकडे जमा होईल.

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींकडून सरकारकडे खेळत्या भांडवलावरील कर्जाच्या मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. दरम्यान यावर आचारसंहितेपूर्वी राज्यातील प्रस्ताव पाठवलेल्या कारखान्यांची छाननी करून त्यानुसार सरकारच्या हमीवर कर्जाचे प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास निगमला पाठवण्यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली.

यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपला समर्थन करणाऱ्या १३ साखर कारखान्यांची समितीने निवड केली. त्यामध्ये भाजपचे ५ राष्ट्रवादीचे ७ आणि एक कारखाना काँग्रेसशी संबंधित आमदाराचा आहे. विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड साखर कारखान्यास (भोर) ८० कोटी रुपयांची कर्जहमी देण्यात आली आहे.

अजित पवार गट –

लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखाना (बीड) – १०४ कोटी

किसनवीर (सातारा) – ३५० कोटी

किसनवीर (खंडाळा) – १५० कोटी

लोकनेते मारोतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना (नेवासा) – १५० कोटी

अगस्ती (अहमदनगर) – १०० कोटी

अंबाजोगाई (बीड) – ८० कोटी

शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) – ११० कोटी

भाजपशी संबधित –

संत दामाजी(मंगळवेढा) – १०० कोटी

वृद्धेश्वर (पाथर्डी) – ९९ कोटी

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (कोपरगाव) – १२५ कोटी

तात्यासाहेब कोरे वारणानगर (कोल्हापूर) ३५० कोटी

विठ्ठलसाई (धाराशिव) -१०० कोटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here