लातूर : उजना तालुक्यातील सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता २१ मार्च रोजी झाली. कारखान्याचे चेअरमन तथा आमदार बाबासाहेब पाटील यांनी या हंगामात अत्यंत कमी पाऊस झाला असतानाही कठीण परिस्थितीत यशस्वीरित्या गाळप केल्याबद्दल व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव, कारखान्यातील सर्व अधिकारी कर्मचारी व कामगारांचे विशेष कौतुक केले. कारखान्याने १४१ दिवसांच्या हंगामात ४ लाख ९४ हजार ३१ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ५ लाख २७ हजार ५६२ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
कारखान्याच्या इंजिनिअरिंग विभागातील मिल फिटर संगम हल्लाळे यांच्या हस्ते पूजा व माजी मंत्री बाळासाहेब जाधव, कारखान्याचे चेअरमन तथा आ. बाबासाहेब पाटील, व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव यांच्या हस्ते आरती करून, श्रीफळ वाढविण्यात आला. व्यासपीठावर माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सुरज पाटील, प्रशांत पाटील, आप्पासाहेब झगडे, व्हाईस प्रेसिडेंट पी. जी. होनराव, जनरल मॅनेजर एस. आर. पिसाळ, बी के कावलगुडेकर, एस.बी. शिंदे, एल. आर. पाटील, डॉ. आनंद पाटील, एस. टी. सावंत, वाय. आर. काळे, व्ही. के. येदले, सागर जाधव, चीफ इंजिनिअर ढगे, मुल्लाणी आदी उपस्थित होते. कपिल लव्हराळे यांनी सूत्रसंचालन केले. जनरल मॅनेजर पी. एल. मिटकर यांनी आभार मानले.