मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली असून, एप्रिल महिन्यात 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. फक्त 16 दिवस बँका सुरू राहणार आहेत. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 एप्रिल रोजी बँका बंद राहणार आहेत. ईदमुळे बँकांना सुट्टी आहे.
बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी येथे पहा…
1 एप्रिल 2024 – आंध्र प्रदेश, इटानगर, तेलंगणा, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, इंफाळ, कानपूर, डेहराडून, बेलापूर, मुंबई, जयपूर, रायपूर, श्रीनगर, लखनौ, कोहिमा, अहमदाबाद, पाटणा, आगरतळा, भुवनेश्वर, भोपाळ, गुवाहाटी, नवी दिल्ली, नागपूर, जम्मू, कोची, पणजी, तिरुअनंतपुरम आणि रांची येथे बँका बंद राहतील.
5 एप्रिल 2024 – जमात-उल-विदा आणि बाबू जगजीवन राम यांच्या वाढदिवसानिमित्त तेलंगणा, हैदराबाद, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँकांना सुट्टी असेल.
7 एप्रिल 2024 – रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
9 एप्रिल 2024 – उगादी उत्सव, तेलुगू नववर्ष, गुढीपाडवा, नवरात्रीच्या प्रारंभामुळे बंगळुरू, नागपूर, बेलापूर, हैदराबाद, जम्मू, चेन्नई, इम्फाळ, मुंबई, श्रीनगर आणि पणजी येथे सुट्टी असेल.
10 एप्रिल 2024 – ईदनिमित्त केरळ आणि कोचीमध्ये बँका बंद राहणार आहेत.
11 एप्रिल 2024 – ईदनिमित्त देशभरात बँका बंद राहणार आहेत.
13 एप्रिल 2024 – महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशभरात बँकांना सुट्टी असेल.
14 एप्रिल 2024 – रविवार असल्याने बँका बंद राहतील.
15 एप्रिल 2024 – हिमाचल दिनानिमित्त शिमला आणि गुवाहाटीमध्ये बँकांना सुट्टी असेल.
17 एप्रिल 2024 – श्री रामनवमीच्या सणानिमित्त बेलापूर, रांची, अहमदाबाद, मुंबई, पाटणा, डेहराडून, जयपूर, शिमला, कानपूर, भोपाळ, लखनौ, चंदीगड, हैदराबाद, गंगटोक, नागपूर, भुवनेश्वर येथे बँका बंद राहतील.
20 एप्रिल 2024 – आगरतळा येथे गरिया पूजेमुळे बँका बंद राहतील.
21 एप्रिल 2024 – रविवार असल्याने संपूर्ण देशात बँकांना सुट्ट्या असतील.
27 एप्रिल 2024 – महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.
28 एप्रिल 2024 – रविवार असल्याने संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असणार आहे.