नवी दिल्ली : आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन (APCC) क्लायमेट सेंटरने भारतासाठी या वर्षीचा पहिला मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. APCC ने एप्रिल ते जून आणि जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी दोन स्वतंत्र अंदाज दिले आहेत. अहवालानुसार, जुलै ते सप्टेंबर या मुख्य मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
APCC ने 15 मार्च 2024 रोजी ENSO (एल निनो-सदर्न ऑसिलेशन) अलर्ट सिस्टम अपडेट सादर केले. ENSO परिस्थिती एप्रिल ते सप्टेंबर 2024 या कालावधीसाठी ला निनाचा अंदाज वर्तवते. APCC क्लायमेट सेंटरने जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान पूर्व आफ्रिकेपासून अरबी समुद्र, भारत, बंगालचा उपसागर आणि इंडोनेशिया, कॅरिबियन समुद्र परिसरात सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
यापूर्वी, भारतीय हवामान खात्याने (IMD) म्हटले होते की, एल निनोच्या कमी प्रभावामुळे आणि मे नंतर पॅसिफिकमधील ला-निना परिस्थितीमुळे भारतात यावर्षी मुबलक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ला निना घटना दर 3 ते 5 वर्षांनी घडते, परंतु काहीवेळा सलग वर्षांमध्ये होऊ शकते. ला निना हे एल निनो/सदर्न ऑसिलेशन (ENSO) चक्राच्या थंड अवस्थेचे प्रतिनिधित्व करते. जून-सप्टेंबरमधील मान्सून देशातील सुमारे 70% पाऊस पिकांना आणि जलाशयांमध्ये पाण्याची साठवण करण्यासाठी फायदेशीर ठरतो.
IMD चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, सततच्या एल निनोच्या परिस्थितीमुळे यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र उष्णतेची शक्यता आहे. तथापि, प्रचलित एल निनोची परिस्थिती उन्हाळी हंगामानंतर तटस्थ होण्याची शक्यता आहे. चांगल्या मान्सूनपूर्वी, प्रचलित एल निनो परिस्थितीमुळे भारतामध्ये तीव्र उष्णता असेल. तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र आणि ओडिशाच्या अनेक भागांमध्ये सामान्य दिवसांपेक्षा जास्त उष्णतेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मार्चमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त (29.9 मिमीच्या दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा 117 टक्के जास्त पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.