महाराष्ट्र : राज्यातील १०५ कारखान्यांच्या गळीत हंगामाची समाप्ती

कोल्हापूर : राज्यात १०५ हून अधिक साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची समाप्ती झाली आहे. यंदाही ऊस गाळपात सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा सोलापूरचे गाळप अधिक झाले आहे. यंदा राज्यात २०७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. आतापर्यंत १० कोटी २३ लाख मेट्रिक टन गाळप झाले असून, १० कोटी ४० लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर साखर कारखाने बंद होण्यास सुरुवात झाली आहे.

सोलापूर जिल्ह्याचे गाळप एक कोटी ५९ लाख टन झाले असून, कोल्हापूरचे एक कोटी ४८ लाख टन झाले आहे. पुणे व अहमदनगर जिल्ह्यांचे गाळप प्रत्येकी एक कोटी २२ लाख टन, तर सातारा जिल्ह्याचे गाळप एक कोटी ३ लाख मेट्रिक टन झाले आहे. आजअखेर शंभरहून अधिक साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. सोलापूर जिल्ह्यात तीन-चार साखर कारखाने सुरू असून, ते मार्च अखेरपर्यंत चालतील, असे सांगण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील १०-१२ साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here