नाशिक : भाजपचे धुळ्याचे उमेदवार व विद्यमान खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी आपल्या तिसऱ्या खासदारकीच्या काळात धुळे हे औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येईल, असे सांगितले. आपल्या मतदारसंघात पाण्याची उपलब्धता आणि पायाभूत सुविधा (रस्ते आणि उद्योग) निर्माण करण्यात यश आल्याचा दावा करत डॉ. भामरे हे पुन्हा लोकसभा निवडनुकीच्या मैदानात उतरले आहेत.
‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार ते म्हणाले, सर्वांगीण विकासासह धुळे शहर औद्योगिक हब होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. विशेषतः अन्न प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य दिले जात आहे. इथेनॉल उद्योग वाढीवर भर असेल. डॉ. भामरे म्हणाले, जिल्ह्यामध्ये इथेनॉल उत्पादनासाठी आवश्यकबाजरी, ज्वारी, मका यासह विकासासाठी उत्तम कच्चा माल उपलब्ध आहे.
ते म्हणाले, 9 टीएमसी सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेला केंद्राकडून 2400 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. ही योजना आता सुलवाडे धरणातून ५० किमी अंतरावरील जामफळ जलाशयात पाणी खेचणार आहे. यामुळे धुळ्यातील पिण्यासाठी, सिंचनासाठी आणि उद्योगांसाठी पाणी उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.