उत्तर प्रदेशातील ऊस पट्ट्यात तापले लोकसभा निवडणुकीचे वातावरण !

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीवरून राजकारण तापले आहे. भाजप, सपा, बसपा, काँग्रेस, आरएलडीसह सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. विशेषत: राज्याच्या उसाच्या पट्ट्यात म्हणजेच पश्चिम उत्तर प्रदेशात यावेळी कोण जिंकणार आणि कोण हरणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ऊस दर, थकीत बिले हे या भागातील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. लोकसभा निवडणूक या मुद्द्यांभोवती फिरण्याची शक्यता आहे.

भाजपने २०१४ मध्ये पश्चिम उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या सर्व १६ जागा जिंकल्या होत्या, परंतु सपा, बसपा आणि आरएलडीच्या युतीनंतर २०१९ मध्ये ती नऊ जागांवर कमी झाली. आता आरएलडीने भाजपसोबत युती केली आहे. त्यामुळे जाट मते एकवटण्याची अपेक्षा आहे. यावेळी बसपा वेगळी लढत आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशातील उसाची राजधानी असलेल्या मुझफ्फरनगरच्या ऊस क्षेत्रात भाजपने राज्यातील प्रमुख जाट चेहरा, केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांना रिंगणात उतरवले आहे. बालियानचे प्रमुख प्रतिस्पर्धी सपाचे नरेंद्र मलिक आहेत. येथे ऊस दराचा मुद्दा खूप महत्त्वाचा मानला जातो. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिकांना जास्त भाव मिळावा अशी मागणी आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात उसाचा दर ३७० रुपये प्रती क्विंटल आहे. शेतकरी ऊस पिकासाठी किमान प्रति क़्विटल ४०० रुपये दराची मागणी करत आहेत. काही शेतकऱ्यांनी चालू हंगामातील ऊस बिलांच्या थकबाकीबद्दलही नाराजीचा सूर लावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here