राहुरी तालुक्यात दहा लाख टनापेक्षा अधिक उसाचे गाळप

अहिल्यानगर : यंदाचा गळीत हंगामात राहुरी तालुक्यातील दहा लाख टनापेक्षा अधिक उसाचे गाळप करण्यात आले आहे. तालुक्यातील प्रसाद शुगर्सने आतापर्यंत पाच लाख 55 हजार मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. कारखान्याने पाच लाख 63 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याचा सरासरी साखर उतारा 9.85 टक्के इतका आहे.

प्रसाद शुगर्सबरोबरच अशोक, संगमनेर, प्रवरा, मुळा व अन्य साखर कारखान्यांनी राहुरी येथील ऊस नेला आहे. अनेक साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना 2700 रुपयांपर्यंत पहिला हप्ता दिलेला आहे. मागील वर्षी झालेल्या बर्‍यापैकी पावसाने उसातचे उत्पादन चांगले झाले होते. सध्या तालुक्यात थोडाच ऊस शिल्लक असून शेतकरी त्याचे गाळप करण्यासाठी धडपड करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here