सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक २, करकंब कारखान्याने या हंगामात सहा लाख २५ हजार ८८८ मे. टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याने ११.१४ टक्के साखर उताऱ्याने सहा लाख ६३ हजार ९०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. कारखान्याची घौडदौड वेगाने सुरू असून साखर उताऱ्यामध्ये कारखाना जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती संचालक रणजीतसिंह शिंदे यांनी दिली. कारखान्याने सहवीज निर्मिती प्रकल्पातून दोन कोटी ४० लाख ४० हजार युनिट वीज विद्युत महामंडळाला निर्यात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
कारखान्याचे संचालक तथा सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह शिंदे यांच्या हस्ते युनिट नं.२ करकंब येथील ऊस गळीत हंगामाचा सांगता समारंभ झाला. या हंगामात उत्पादित ६,५३,५५५ व्या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले. जनरल मॅनेजर सुहास यादव यांनी हंगामाच्या कामकाजाचा आढावा सादर केला. कारखान्यामुळे पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांच्या उसाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागला आहे असे रणजीतसिंह शिंदे यांनी सांगितले. दर १० दिवसाला ऊस बिल देणारा विठ्ठलराव शिंदे राज्यातील एकमेव कारखाना आहे असे ते म्हणाले. यावेळी वामनराव माने, आदिनाथ देशमुख, राहुल पुरवत, अभिजीत कवडे, सचिन शिंदे, ज्योतिराम मदने, भारत जाधव, समाधान नरसाळे, हरी कानगुडे, धैर्यशील नाईकनवरे, संजय काळे, किसन कौलगे, शहाजी पाटील कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, जनरल मॅनेजर सुहास यादव, सुनील महामुनी, बाळासाहेब साळुंखे, बाबूराव इंगवले उपस्थित होते.