कर्मयोगी टोपे कारखान्याच्या दोन्ही युनिटमधून आतापर्यंत १४ लाख ४४ हजार टन गाळप पूर्ण

जालना : येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या दोन्ही युनिटमधून आतापर्यंत १४ लाख ४४ हजार ७२० मे. टन उसाचे गाळप पूर्ण करण्यात आले आहे. यातून ११ लाख ५४ हजार ८१० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. साखर उतारा हा ८.४७५ इतका आला आहे. दरम्यान ३ हजार हेक्टरवरील ऊस शिल्लक राहिला आहे.

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर युनिट १ मध्ये १५१ दिवसात ९ लाख ९२ हजार १०० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. यातून ७ लाख २४ हजार ५६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तसेच तीर्थपुरी येथील सागर युनिटमध्ये १५३ दिवसात ४ लाख ५२ हजार ६२० मेट्रिक टन गाळप पूर्ण झाले आहे. यातून ४ लाख ३० हजार २५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्याच्या सागर आणि समर्थ युनिटमधून २ कोटी ६८ लाख ४३ हजार बल्क लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आहे. यात समर्थमधून १ कोटी ९८ लाख ७६ हजार लिटर तर, सागर युनिटमधून ६९ लाख ६६ हजार ३३० लिटर इथेनॉलचे उत्पादन करण्यात आले आहे. ३ कोटी ४२ लाख युनिट वीजनिर्मिती करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here