जागृती शुगरच्या गळीत हंगामाची सांगता, ७ लाख मे. टन ऊस गाळप

लातूर : माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव येथील जागृती शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीजने चालू गळीत हंगामात कारखान्याच्या अध्यक्षा तथा कार्यकारी संचालक गौरवीताई अतुल भोसले- देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ७ लाख २ हजार ३०९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. यंदा ३१ मार्चअखेर पूर्ण क्षमतेने कारखाना चालवून कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप पूर्ण केले. या गाळप हंगामाची सांगता कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांच्या हस्ते कारखानास्थळी विधिवत पूजन करून झाली.

यावर्षी ऊस तोडणी लांबणीवर पडेल, असे चित्र होते. मात्र, जागृती शुगरचे संस्थापक-अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी मार्चअखेर गाळप पूर्ण करण्याबाबत कारखाना प्रशासनास सूचना केल्या होत्या. जागृती शुगर कार्यक्षेत्रातील देवणी, शिरूर अनंतपाळ, निलंगा, उदगीर, चाकूर तालुक्यातील ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सांगता सोहळ्यास कारखान्याचे सरव्यवस्थापक गणेश येवले, रेणा साखर कारखान्याचे संचालक संभाजी रेड्डी, जागृती शुगरचे खाते प्रमुख आर. के. कदम, अतुल दरेकर, विलास पाटील, जी. पी. जाधव, एस. व्ही. वाकडे, मालबा घोणसे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here