मुंबई : अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेडने मोज इंजिनीअरिंग सिस्टम्स लिमिटेडसोबत पुरवठादार करारावर स्वाक्षरी केली आहे. कंपनीने बीएसईकडे केलेल्या नवीनतम नियामक फाइलिंगनुसार म्हटले आहे की, कंपनीने १० एप्रिल २०२४ रोजी मेसर्स मोज इंजिनियरिंग सिस्टम्स लिमिटेडसोबत धान्यावर आधारित डिस्टिलरी प्लांटची रचना, उत्पादन, पुरवठा, उभारणी आणि कार्यान्वित करण्यासाठी पुरवठादार करारावर स्वाक्षरी केली आहे.
कंपनीने ५ मार्च रोजी केलेल्या फायलिंगमध्ये म्हटले आहे की, कंपनीची स्थापना आणि संचालन सुलभ करण्यासाठी अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेड आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा प्रशासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे कंपनी १६०.३५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पातून २०० लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे आणि तो महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाली ग्रोथ सेंटर येथे असेल.