कोल्हापूर : गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचेजिल्हा बँकेकडून घेतलेल्या ५५ कोटींचा चुकीच्या पद्धतीने विनियोग केल्याची तक्रार कारखान्याचे माजी संचालक, कारखान्याच्या निवृत्त कर्मचारी संघटनेचे नेते शिवाजी खोत व सभासद आप्पासाहेब लोंढे यांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली होती. याबाबत प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश मंगळवारी आहेत. यासाठी तृतीय विशेष लेखापरीक्षक वर्ग १ सहकारी संस्था (साखर) डी. बी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३० एप्रिलपर्यंत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हा बँकेकडून घेतलेल्या ५५ कोटी कर्ज २९ अटींना बांधील राहून दिले, याविषयी कोणतीच माहिती कारखान्याकडे नाही. कर्जे अल्पमुदतीची असताना १६ कोटी ९३ लाख डिस्टीलरी प्रकल्पाच्या ठेकेदाराला दिले. हे नियमबाह्य असून, आवश्यक कागदपत्रे कारखान्याकडे नाहीत. बॉयलर रिपेअर्स ॲन्ड मेटनन्स खाली बिदर किसान एस. एस. के. कारखान्यास २ कोटी २४ लाख २० हजार बेकायदेशीर दिले. कारखान्याची आर्थिक स्थिती, कर्जे व त्याचा विनियोग अवास्तवपणे केला. रकमेचा विनियोग टेंडर प्रक्रिया न राबवता व संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा न करता केला. या आर्थिक व्यवहाराबाबत संशय आहे अशी तक्रार करण्यात आली होती.