सांगली : चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याने आगामी गळीत हंगाम २०२४-२५ साठी तोडणी वाहतुकीचा करार सुरू केले आहेत. पहिल्या टप्प्यात तोडणी वाहतूक कंत्राटदार दिलीप कदम (इंग्रळ), दिनकर गायकवाड (रिळे), विनायक पाटील (सागाव) व विष्णू पाटील (मांगले, ता. शिराळा), वसंत साळुंखे (येडेनिपाणी), नामदेव लाड (चरण) व बंडा पाटील (शिंपे, शाहूवाडी) यांच्याशी मुहूर्तावर करार करण्यात आले.
कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील यांच्या हस्ते या करारांना प्रारंभ करण्यात आला. कारखान्याचे सचिव सचिन पाटील, मुख्य शेती अधिकारी ए. ए. पाटील, मुख्य लेखापाल भानुदास पाटील, आसवनी प्रमुख युवराज गायकवाड, खरेदी अधिकारी राजेंद्र पाटील, मुख्य मिश्रक ए. एस. पाटील, पर्यावरण विभागप्रमुख शरद पाटील, संगणक विभागप्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह शेती विभागातील अधिकारी, शेती मदतनीस, कर्मचारी आदी उपस्थित होते.