सांगली : ‘महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये ज्यांनी त्याग बलिदान केले, त्यांची आठवण आपण कायम ठेवायला हवी’, अशी भावना राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी व्यक्त केली. कारखान्याच्या साखराळे युनिटमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरुल शाखा, कारंदवाडी युनिट, तिप्पेहळ्ळी (जत) या चारही युनिटच्या कार्यस्थळावर महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
‘राजारामबापू’च्या साखराळे कार्यस्थळावर कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सुरक्षाधिकारी विरसेन गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, जयवंत पाटील, नामदेव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा रक्षकांनी ध्वजास मानवंदना दिली. वाटेगाव – सुरुल कार्यस्थळावर चीफ केमिस्ट संताजी चव्हाण, कारंदवाडी कार्यस्थळावर युनिट हेड विजय मोरे आणि तिप्पेहळ्ळी (जत) कार्यस्थळावर चिफ केमिस्ट सुदाम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सचिव डी. एम. पाटील, कामगार संचालक मनोहर सन्मुख, विकास पवार, सुनील सावंत, प्रशांत पाटील, प्रेमनाथ कमलाकर, संतोष खटावकर, धैर्यशिल पाटील, महेश पाटील, राजेंद्र चव्हाण, विश्वनाथ पाटसुते, युनिट २ वर संभाजी सावंत, संजय पाटील, कुमार पाटील, युनिट ३ वर उमेश शेटे, संग्राम चव्हाण, सुशिल भंडारे, युनिट ४ वर नंदकिशोर जगताप, श्रीनिवास कुमार आदी उपस्थित होते.