उत्तर प्रदेश : चक्क साखर कारखाना विक्रीचे आमिष, व्यावसायिकाची २६ लाख रुपयांची फसवणूक

कानपूर : उत्तर प्रदेशात साखर कारखाना विकण्याची आणि भंगार मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणुकीची घटना उघड झाली आहे. बस्ती येथील फेनिल साखर कारखान्याबाबत हा प्रकार घडला. येथून भंगार मिळवून देण्याच्या नावाखाली भामट्यांनी व्यावसायिकाची २६ लाखांची फसवणूक केली. फसवणूक करणाऱ्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून कारखाना विक्रीचाही प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. फसवणूक झालेल्या व्यावसायिकाच्या तक्रारीवरून हजरतगंज पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हजरतगंजचे इन्स्पेक्टर विक्रम सिंह म्हणाले की, व्यापारी शैलेंद्र कुमार अवस्थी यांची आरव्ही पार्टनर्सच्या ही फर्म आहे. धनिया (जौनपूर) येथील सीबी सिंग हे त्यांचे मित्र आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी हजरतगंज सप्रू येथील कमरुद्दीन जलालुद्दीन यांच्यासोबत शैलेंद्र कुमार यांची भेट घडवून आणली. भंगार विक्रेता असलेल्या कमरुद्दीनने फेनिल मिल लिमिटेड भंगारही खरेदी केल्याचे सांगितले. यात पैसे गुंतवणूक नफा मिळवण्याचे आमिष दाखवले. सीबी सिंग यांनी कारखान्यातून भंगार खरेदीची काही कागदपत्रे आणि ८० कोटी रुपयांच्या पेमेंटचे बँक तपशील दाखवले. त्यामुळे त्यांनी कमरुद्दीनला २६ लाख रुपये दिले. माल उचलण्यासाठी गेल्यावर्षी १६ जून रोजी कामगारांची बैठकही बोलावण्यात आली. मात्र, त्याआधी एक दिवस फोन करून दोन दिवस थांबण्यास सांगितले. नंतर दोघेही टाळाटाळ करू लागले. पैशांची मागणी केल्यावर ठार मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर दिलेला चेक बाऊन्स झाला. यातक्रारीच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here