सातारा : किसन वीर व खंडाळा या दोन्ही कारखान्यांनी १५ डिसेंबरपर्यंतची सुमारे १६ कोटी ७६ लाख ८१२ रुपये ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहेत. कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील यांनी सुतोवाच केल्याप्रमाणे नुकतीच नोव्हेंबर महिन्याची बिलेही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली आहेत. कारखान्याने ऊसाच्या बिलाची रक्कम प्रती मेट्रिक टन ३ हजार रुपयांप्रमाणे बिले दिली आहेत, अशी माहिती किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.
व्हाईस चेअरमन शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, साखरेच्या भावामध्ये चढ-उतार तसेच साखरेस उठाव नसल्याने आपल्या संचालक मंडळास बीले देण्यास विलंब होत आहे. उर्वरित पंधरवड्यांची बिलेही लवकरात लवकर जमा करणार आहे. १ ते १५ डिसेंबरपर्यंतच्या ऊसाचे बील १६ कोटी ७६ लाख ८१२ रूपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग केले आहे.