सहकार शिरोमणी कारखान्याचे तोडणी वाहतूक करार सुरू : चेअरमन कल्याणराव काळे

सोलापूर : येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यात ऊस तोडणी वाहतुकीचे करारात चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हा. चेअरमन भारत कोळेकर व तोडणी वाहतूक उपसमितीचे चेअरमन मोहन नागटिळक यांच्या हस्ते करण्यात आला. २०२४-२५ या ऊस गळीत हंगामाची तयारी कारखान्याने सुरू केली आहे. कारखान्यासह डिस्टीलरी प्रकल्प तसेच सहवीज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मशिनरी देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत, अशी माहिती चेअरमन कल्याणराव काळे यांनी दिली.

कारखान्याने येत्या हंगामात सुमारे ४ लाख २५ हजार मे.टन ऊस गळीताचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दैनंदिन सरासरी ३ हजार ५०० मे.टन प्रमाणे गाळपासाठी २७५ ट्रक व ट्रॅक्टर, ३०० बैलगाडी, १०० बजट ट्रॅक्टर गाडी तसेच ३ ऊस तोडणी मशिनचे करार करुन तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर यांनी सांगितले. धनाजी कवडे, शंकर बागल, अर्जुन बागल, सुरेश बागल, संग्राम कवडे यांचे करार करण्यात आले. संचालक परमेश्वर लामकाने, प्र. कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे, प्रतापराव थोरात, हरीभाऊ गिड्डे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here