सातारा : वर्धन ॲग्रो कारखान्यात रोलर पूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. गेल्या सात वर्षात कारखाना चालवताना अनेक अडचणीचे आले, तरीही आत्मविश्वासाने सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र राहून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने काटेकोर नियोजनाने सात हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. वर्धन कारखान्याची ओळख आपल्या हक्काचा कारखाना म्हणून सभासदांमध्ये, ऊस उत्पादकांमध्ये झाली आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी केले.
वर्धन ॲग्रो कारखान्यात गळीत हंगाम २०२४-२५ चा मिल रोलरचा पूजन समारंभ चेअरमन तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संचालक भीमराव पाटील यांनी सर्वांच्या पाठबळाने यंदाच्या गळीत हंगामात कारखाना विक्रमी गाळप करेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यकारी संचालक विक्रमशील कदम म्हणाले की, ऊस तोडणी वाहतूक वाहनांचे करार सुरू आहेत. कारखाना नियोजित वेळेत सुरू करून यावेळी उच्चांकी गाळप करण्याचे कारखान्याचे उद्दिष्ट आहे. संचालक भीमराव पाटील, संपतराव माने, पृथ्वीराज निकम, कार्यकारी संचालक विक्रमशील कदम, जनरल मॅनेजर श्रीकांत मोरे, सतीश पिसाळ, कुलकर्णी, संचालक संतोष घाडगे, शरद चव्हाण, अविनाश साळुंखे, डी. वाय. पाटील, अश्विन कदम, सावकार जाधव, युवराज सूर्यवंशी, रवी पवार, उमेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.