अवाजवी आडसाली ऊस लागवडीवर मर्यादा आणण्याचा सोमेश्वर कारखान्याचा निर्णय

पुणे : अवाजवी आडसाली लागवडीवर मर्यादा आणावी, असा निर्णय सोमवारी सोमेश्वर साखर कारखान्याच्यावतीने आयोजित चर्चासत्रात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप होते. ऊस लागवड हंगाम एक जुलैपासून सुरू करण्यासह रोप लागवड केल्यापासून तीस दिवसांत नोंद करावी असा निर्णयही झाला. ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, शिवाजीराजे निंबाळकर, विश्वास जगताप, सुनील भगत, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, ऋषी गायकवाड, किसन तांबे, हरिभाऊ भोंडवे, जितेंद्र निगडे, शांताराम कापरे, अनंत तांबे, प्रवीण कांबळे, रणजित मोरे, कमल पवार उपस्थित होते.

सभेमध्ये को ८६०३२ जातीच्या उसाची तोडणी संपल्यावरच फुले २६५ ची तोडणी सुरू करायची हा निर्णय मागे घेण्यात आला. त्याऐवजी ज्या तारखेचा ८६०३२ तोडून संपेल, त्या तारखेचा फुले २६५ तोडल्यावरच पुढे जायचे, असा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, की सरत्या हंगामात अंदाज चुकला. एकरी उत्पादनात वाढ, टंचाईग्रस्त जिराईत भागातील साडेपाच लाख टन ऊस प्राधान्याने आणणे, आडसालीसोबत अन्य लागवडीला न्याय दिल्याने तोडी लांबल्या. सभासदांना दिलेले अनुदान, खोडकी बिल गेटकेनधारकांना देणार नाही. आगामी हंगामात ३१ हजार एकरांच्या नोंदी असल्याने गटकेन आणावा लागेल. सभासदांच्या संमतीने गेटकेन ऊस आणला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here