उत्तराखंड : ऊस पिकाला पोक्का बोईंग रोगाचा फटका

काशीपूर : उत्तर प्रदेशप्रमाणेच उत्तराखंडमध्येही ऊस पिकावर पोका बोईंग रोगाचे आक्रमण वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा औषध फवारणीचा खर्च वाढत असून, त्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे. ऊस विभागाचे सहायक आयुक्त नीलेश कुमार यांनी नदेही विभागातील भगवंतपूर गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पोका बोईंग रोगाबाबत माहिती देऊन या रोगाला आळा घालण्यासंबंधी मार्गदर्शन केले.

पोक्का बोईंग हा उसावरील बुरशीजन्य रोग असल्याचे त्यांनी सांगितले. या रोगामुळे उसातील साखरेचे उत्पादन ४० टक्क्यांहून अधिक कमी होऊ शकते. या रोगाचे वैशिष्ट्य म्हणजे उसाची पाने एकत्र आकसतात किंवा पाने खराब होणे किंवा वाकडी होणे हीदेखील या रोगाची लक्षणे आहेत. हे टाळण्यासाठी शेतात १५ दिवसांच्या अंतराने कार्बेन्डाझिमची २ ते ३ वेळा फवारणी करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here