लखनौ : उत्तर प्रदेशात, २०२४-२५ च्या गळीत हंगामासाठी प्रशासनाकडून ऊस सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या कामाला वेग देण्यात आला आहे. ऊस विभाग या सर्वेक्षणावर लक्ष ठेऊन आहे. सर्वेक्षणाची सतत पडताळणी केली जात आहे. ऊस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण २७ हजार २९३ गावांतील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.
सहारनपूर विभाग ७६ टक्के ऊस सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून राज्यात आघाडीवर आहे. सर्वेक्षण वेळेवर पूर्ण केल्यामुळे, ऊस नोंदणीची यादी लवकर प्रदर्शित करणे सोपे होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये, ऊस विभाग ऊस सर्वेक्षणाची सतत पडताळणी करत आहे. या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही याची काळजी घेत आहे. ऊस सर्वेक्षणाचे काम महत्त्वाचे आहे. यातून ऊस विभागाला ऊस उत्पादनाचा अंदाज बांधण्यास मदत होते.