तेरणा साखर कारखान्यात नारळ, वटवृक्ष लावून पर्यावरण दिन

धाराशिव : तालुक्यातील ढोकी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात बुधवारी, दि. ५ रोजी विविध उपक्रमांनी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी कारखाना परिसरात नारळाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तर तेरणा साखर कारखाना प्रशालेत वटवृक्ष लावून साजरा करण्यात आला.

भैरवनाथ शुगर वर्क्स संचलित तेरणा कारखान्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला चीफ इंजिनिअर प्रमोद देशमुख, चीफ अकाउंटंट बिराजदार, सिव्हिल इंजिनीअर रवि कदम, मगर, डिस्टिलरी केमिस्ट अंगद काळे, आव्हाड, शिनगारे, नवनाथ लंगडे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेरणा साखर कारखाना प्रशालेतील कार्यक्रमाला मुख्याध्यापक संजय पाटील, वरिष्ठ लिपिक, नारायण थोडसरे, सेवक आत्माराम घोडके, दयानंद बनसोडे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here