देसाई साखर कारखान्याकडून प्रती टन १५० रुपये ऊस बिल जमा : चेअरमन यशराज देसाई

सातारा : राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ चा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडला. यंदा गळीतास आलेल्या उसाच्या एफआरपीपोटी १५० रुपये प्रती टनाप्रमाणे ३३६.६२ लाख रुपये संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आले आहेत. कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी ही माहिती दिली.

चेअरमन देसाई यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कारखान्याने गळीत हंगामामध्ये २,२४,४१३.६५२ मे. टन ऊस गाळप केले आहे. कारखान्याने सरासरी ११.९८ टक्के साखर उताऱ्याने २,६८,७७५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याने गळीत हंगामामध्ये पहिली उचल एफआरपी पोटी २५०० रुपये प्रतीटनप्रमाणे ५६१०.३४ लाख रुपये ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अदा केली आहे. उर्वरित एफआरपीपोटी १५० रुपये टनाप्रमाणे ३३६.६२ लाख रुपये बँक खाती ५ जून रोजी वर्ग केली आहे. कारखान्याच्या आधुनिकीकरणासह विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here