किसन वीर कारखान्याकडून ऊस तोडणी वाहतूक करार : उपाध्यक्ष प्रमोद शिंदे

सातारा : किसन वीर कारखान्याने आगामी सन २०२४-२५ या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी वाहतुकीच्या करारास सुरुवात केली आहे. सातारा सहकारी शेती औद्योगिक तोडणी व वाहतूक सोसायटीमार्फत कारखाना कार्यस्थळावर प्राथमिक स्वरुपात नितीन कणसे, नारायण कणसे, धनाजी जाधव, ओंकार मोरे, दीपक जाधवराव, हणमंत आसबे, अविनाश सावंत, किरण सावंत, सुरेश घाटे, आदिनाथ सावंत, मनोहर कोकरे या ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदारांनी करार केले. कारखाना कार्यस्थळावर उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्या हस्ते ऊसतोडणी वाहतूक संस्थेचे अध्यक्ष बबनराव साबळे, उपाध्यक्ष अजय कदम व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत करार करण्यात येत आहेत.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी सांगितले की, ‘किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील यांच्या अथक प्रयत्नातून किसन वीर व किसन वीर- खंडाळा कारखान्याचे दोन हंगाम यशस्वीरीत्या पार पडले आहेत. त्यामुळे कारखान्याची गेलेली पत परत मिळाली आहे. दरम्यान, कार्यक्रमाला कारखान्याचे संचालक रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, तोडणी वाहतूक संस्थेचे संचालक मानसिंग साबळे, शिवाजीराव काळे, अरविंद कदम, नानासो कदम, चंद्रकांत फडतरे, शामराव गायकवाड, सूर्यकांत बर्गे, अॅड. उदयसिंह पिसाळ, मॅनेजर बी. आर. सावंत, शेती अधिकारी विठ्ठलराव कदम, शामराव गायकवाड, अजय भोसले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here