उत्तर प्रदेश : प्रगत शेतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळतेय प्रशिक्षण

पिलीभीत : उत्तर प्रदेशातील साखर कारखाने आणि ऊस विभाग ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत आहे. शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी योग्य प्रशिक्षण मिळावे, जेणेकरून त्यांचे उत्पन्नही वाढेल, असा त्याचा उद्देश आहे. या अनुषंगाने, बारखेडा येथील बजाज हिंदुस्थान शुगर लिमिटेड आणि ऊस विकास परिषदेच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या गटाला शाहजहानपूर येथे ऊस संशोधन परिषदेत प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. तेथे शेतकऱ्यांना उसाशी संबंधित सर्व माहिती मिळेल.

या कार्यक्रमात कारखान्याचे युनिट हेड रिजवान खान आणि एससीडीआय मनोज साहू यांनी बसला हिरवा झेंडा दाखवला. ऊस विकास परिषद क्षेत्रातील ५० ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संशोधन परिषदेत शास्त्रज्ञांमार्फत उसाची प्रगत लागवड, रोग व कीड व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, ऊस बांधणी याविषयी प्रशिक्षण देणार आहे. यावेळी वरिष्ठ महाव्यवस्थापक ऊस सुबोध गुप्ता यांच्यासह साखर कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here