सिद्धेश्वर कारखान्याच्या जमीन खरेदीची बुलडाणा अर्बनची ऑफर फेटाळली

छत्रपती संभाजीनगर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीसाठी काढलेली ७ हेक्टर ४३ आर जमीन खरेदी करताना ५० टक्के रक्कम कर्ज खात्यात वळती करावी, अशी बुलडाणा अर्बन को- ऑ. क्रेडिट सोसायटीने घातलेली अट तहसीलदार रुपेश खंदारे यांनी फेटाळून लावली.बुलढाणा अर्बनने प्रशासनाने ठरवलेल्या ६ कोटी १४ लाख रुपयांमध्ये ही जमीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती. कामगार व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिल्लोड येथील तहसीलदारांनी कारखान्याच्या ५७८ कर्मचाऱ्यांची उपदानाची ८ कोटी ५ लाख रुपयांची रक्कम देण्यासाठी जमीन विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे.

कर्मचाऱ्यांच्या उपदानाची रक्कम देण्यासाठी कारखान्याची ७ हेक्टर ४३ आर जमीन विक्रीसाठी आतापर्यंत ८ वेळा निविदा काढण्यात आल्या; परंतु खरेदीदार मिळालेला नाही. आता नवव्यांदा निविदा काढली आहे. यासाठी १८ जून रोजी लिलाव होणार आहे. दरम्यान, तहसीलदार खंदारे यांनी कारखान्याचे डिस्टलरी युनिट आणि एक ट्रक, एक ट्रॅक्टर व ६० बैलगाड्या जप्त करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय कारखान्याच्या मालकीची एक जुनी जीप जप्त केली आहे.गेल्या ७ वर्षांत १९ हेक्टर जमिनीची विक्री करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here