नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेची बैठक 22 जून रोजी नवी दिल्लीत होणार आहे.ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या शेवटच्या बैठकीनंतर परिषदेची ही पहिलीच बैठक आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या 53 व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.त्यामध्ये राज्यांचे अर्थमंत्री उपस्थित असतील.
GST काउंसिलची वेळोवेळी बैठका होत असतात. या बैठकीत कर दर, धोरणात्मक बदल आणि प्रशासकीय मुद्द्यांचा समावेश असतो. भारताची अप्रत्यक्ष कर रचना तयार करण्यात ही परिषद महत्त्वाची भूमिका बजावते. 53व्या GST कौन्सिलच्या बैठकीतील निर्णय आणि शिफारशींवर व्यवसाय, धोरणकर्ते आणि सामान्य लोकांसह विविध भागधारकांचे बारकाईने लक्ष असेल. 2017 पासून GST कर लागू करण्यात आला.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी 2024-25 च्या पहिल्या केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली आहे.