उत्तर प्रदेश : साखर कारखान्याकडून ऊस बिले देण्यास टाळाटाळ, शेतकरी वैतागले

अमरोहा : जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी वारंवार आदेश देऊनही मंडई धनौरा येथील वेव्ह शुगर मिलने शेतकऱ्यांची उसाची थकीत बिले देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. कारखाना शेतकऱ्यांची बिले वेळेत देण्यात अपयशी ठरला आहे.जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी मंगळवारी पुन्हा कारखान्याच्या व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन तत्काळ पैसे देण्याचे निर्देश दिले आहेत.ऊस बिले वेळेवर न दिल्यास पुढील गळीत हंगामात कारखान्याच्या ऊस खरेदी केंद्रांमध्ये कपात केली जाईल, शिवाय साखर, मोलॅसिस, बेगास आणि इथेनॉलच्या साठ्याच्या गोदामावर लक्ष ठेवण्यासाठी विभागीय अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कारखान्याने शेतकऱ्यांची ६३.२९ कोटी रुपयांची बिले थकवली आहेत. याबाबत जिल्हा ऊस अधिकारी मनोज कुमार यांनी ५ जून रोजी कारखाना व्यवस्थापनासोबत बैठक घेत पंधरा दिवसांत शेतकऱ्यांची थकबाकी भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही साखर कारखान्याने निष्काळजीपणे शेतकऱ्यांची उसाची थकबाकी दिलेली नाही. मंगळवारी त्यांनी पुन्हा कारखान्याच्या अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात बोलावून बिलाबाबत विचारणा केली. यावेळी कारखानदारांच्यावतीने येत्या तीन दिवसांत ११ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला साखर कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक जगतवीर सिंग, ऊस व्यवस्थापक संजीव मलिक, धनौरा समितीचे प्रभारी सचिव यतेंद्र हल्दिया आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here