Jakson Green छत्तीसगढमध्ये उभारणार जगातील पहिला फ्लू गॅसपासून एथेनॉल उत्पादन करणारा प्रकल्प

नवी दिल्ली :भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे फ्लू गॅस CO2 ला ४G इथेनॉलमध्ये रूपांतर करण्याच्या जगातील पहिल्या प्रकल्पासाठी जॅक्सन ग्रीनची परवाना, अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (LEPC) भागीदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. NTPC लिमिटेडची NETRA (NTPC एनर्जी टेक्नॉलॉजी रिसर्च अलायन्स) द्वारे विकसित केलेला हा प्रकल्प लारा-छत्तीसगड येथे दोन वर्षांत कार्यान्वित होईल.

फ्लू वायूंपासून दररोज १० टन ४G इथेनॉल तयार करणे, दररोज २५ टन CO२ कॅप्चर करणे आणि ७.५ मेगावॅट इलेक्ट्रोलायझरद्वारे दररोज तीन टन ग्रीन हायड्रोजन तयार करणे, हे प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. कॅप्चर केलेल्या CO2 आणि हायड्रोजनचे LanzaTech Inc द्वारे प्रदान केलेल्या प्रगत मायक्रोबियल किण्वन तंत्रज्ञानाचा वापर करून इथेनॉलमध्ये रूपांतर केले जाईल. या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना, जॅक्सन ग्रीन प्रायव्हेट लिमिटेडचे सह व्यवस्थापकीय संचालक कन्नन कृष्णन म्हणाले की, हा ऐतिहासिक प्रकल्प उभारण्यासाठी एनटीपीसीसोबतचे आमचे दीर्घकालीन संबंध सुरू ठेवल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. पॉवर-टू-एक्स मिशनमध्ये क्रांती आणण्यासाठी आमची वचनबद्धता आणखी मजबूत करत ही भागीदारी आमच्या अनेक संयुक्त प्रकल्पांच्या यशावर आधारित आहे.ते म्हणाले की, भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि स्वच्छ भविष्याला चालना देण्यासाठी इथेनॉलचे उत्पादन वाढवणे महत्त्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here