ब्राझीलकडून अमेरिकन इथेनॉल आयातीवरील १८ टक्के कर ‘जैसे थे’

वॉशिंग्टन :अमेरिकन उद्योग समूह, सरकार आणि ब्राझिलियन इंधन आयातदारांनी कायमस्वरूपी काढून टाकण्याची मागणी करूनही यूएस इथेनॉलवरील १८ टक्के आयात कर ब्राझिलियन चेंबर ऑफ फॉरेन ट्रेड ऑफ इकॉनॉमी मिनिस्ट्री(CAMEX) ने कायम ठेवला आहे. वरील सर्व संस्थानी यापूर्वी ११ एप्रिल रोजी संपलेल्या सार्वजनिक सल्लामसलत कालावधीत कर हटवण्याची विनंती करणाऱ्या टिप्पण्या सादर केल्या होत्या.

याबाबत अमेरिकन ग्रेन्स कौन्सिल, ग्रोथ एनर्जी आणि रिन्यूएबल फ्युल्स असोसिएशनने दिलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, आम्ही या निर्णयामुळे अत्यंत निराश झालो आहोत.अमेरिकन इथेनॉलवरील कर अडथळे दूर करण्यासाठी आणि त्याचा द्विपक्षीय अजेंडा मजबूत करण्याची विनंती आम्ही CAMEX आणि ब्राझील सरकारला करत आहोत.या कराने देशांतर्गत ब्राझिलियन इथेनॉल उद्योगाचे संरक्षण करण्याच्या चुकीच्या प्रयत्नात ब्राझिलियन ग्राहकांवर मोठा आर्थिक भार टाकला आहे.ब्राझील आणि अमेरिका यांच्यातील व्यापार सहकार्याला प्रोत्साहन देण्याची संधी यातून कमी होते.ब्राझील सरकारने वाढत्या महागाईशी लढा देण्यासाठी मार्च २०२२ ते जानेवारी २०२३ पर्यंत हे शुल्क उठवले होते. एक फेब्रुवारी २०२३ रोजी आयात कर १६ टक्के केला. यावर्षी एक जानेवारी रोजी हा दर १८ टक्क्यांपर्यंत वाढवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here