साखर तस्करी: BSF सीमेवरील घुसखोरीबाबत बांगलादेशकडे तक्रार करणार

शिलाँग:सीमा सुरक्षा दल(BSF)मेघालयातील साखर तस्करीत गुंतलेल्या बांगलादेशी नागरिकांकडून घुसखोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांबाबत बांगलादेशकडे औपचारिक तक्रार नोंदवेल, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.याबाबत ‘बीएसएफ’ने जारी केलेल्या निवेदनानुसार, गुरुवारी रात्री ३०-३५ बांगलादेशी तस्करांनी स्थानिक भारतीय ग्रामस्थांच्या मदतीने कुंपण नसलेल्या सीमा चौकीवरील(बीओपी)कुलियांग गावाजवळील भारतीय हद्दीत घुसखोरी केली.भारतीय गावकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे साखर गोळा करणे हा त्यांचा उद्देश होता.

दरम्यान, जेव्हा बीएसएफच्या जवानांनी पाठलाग केला, तेव्हा तस्कर आणि काही स्थानिक ग्रामस्थांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. जानेवारी २०२४ पासून, त्यांच्या सैन्याने कुलियांग परिसरात १,००,००० किलोपेक्षा जास्त साखर जप्त केली आहे, ज्यामुळे सीमा ओलांडून तस्करीच्या प्रयत्नांना प्रभावीपणे रोखले गेले आहे, असा दावा बीएसएफच्या निवेदनात करण्यात आला आहे.बीएसएफने सीमावर्ती भागातील स्थानिक रहिवाशांना बेकायदेशीर कृत्यांपासून दूर राहण्याचे आणि बांगलादेशी तस्करांना सहकार्य न करण्याचे आवाहन केले आहे. सीमापार होणाऱ्या बेकायदेशीर हालचाली रोखण्यासाठी बीएसएफ आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतानाही तस्करीत गुंतलेल्या भारतीय गावकऱ्यांसोबत बीएसएफ जवानांच्या होणाऱ्या “नियमित” संघर्षांबद्दलही या निवेदनात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here