सोलापूर :ऊस पिकावर ड्रोनद्वारे फवारणी केल्यास वेळेची बचत, औषधाचा परिणाम व किफायतशीर औषधांचा वापर असे विविध फायदे होतात.ड्रोनच्या साहाय्याने शेतीमध्ये औषधे, किटकनाशके फवारणी सोयीचे आहे, असे मत सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांनी सांगितले.कारखान्याच्यावतीने आधुनिक पध्दतीने ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस पिकावर फवारणीचे प्रात्यक्षिक झाले.यावेळी ते बोलत होते.पिराची कुरोली येथे पांडुरंग कौलगे यांच्या शेतात एअर बोट एरोस्पेस प्रा.लि.व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या सहयोगाने करण्यात आली.
पिराची कुरोली व भागातील बागायतदारांसमोर प्रात्यक्षिक घेण्यात आली.कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांनी शेतकऱ्यांना ड्रोनची माहिती दिली.ऊस बागायतदारांनी ड्रोन खरेदी केल्यास राज्य सरकारतर्फे ५० टक्के सबसिडी दिली जाईल.संस्थेने ड्रोन खरेदी केल्यास ४० टक्के सबसिडी मिळेल असे सांगण्यात आले. एअर बोट एरोस्पेस कंपनीचे अधिकारी प्रथमेश यांनी फवारणीची माहिती दिली.व्हा. चेअरमन भारत कोळेकर, मोहन नागटिळक, संचालक परमेश्वर लामकाने, अमोल माने, अरुण नलवडे, सुरेश देठे, पांडुरंग कौलगे, इब्राहिम मुजावर, राजाराम माने, प्र.कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे, शेती अधिकारी प्रतापराव थोरात, हरी गिड्ढे आदी उपस्थित होते.