सांगली:शिराळा तालुक्यातील चिखली येथे विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या २६ जूनला होणाऱ्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी संचालक विराज नाईक म्हणाले की, कर्मचाऱ्यांचे आरोग्य व मानसिक स्वास्थ्य भक्कम असले पाहिजे.ज्याप्रमाणे कारखाना सक्षम व विनाअडथळा चालावा म्हणून काळजी घेतो, त्यामुळे उत्पादन चांगले मिळून गळीत हंगाम चांगल्या पद्धतीने पार पडतो.त्याच पद्धतीने हे यंत्रणा चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी वेळच्या वेळी घेणे गरजेचे असते म्हणून आम्ही दरवर्षी आमदार मानसिंगभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य तपासणी शिबीर घेतो.
संचालक विराज नाईक म्हणाले की, शिबिरात खर्चिक चाचण्यांचा समावेश आहे.तो पूर्णपणे मोफत केला जातो.कारखान्याने सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी, तोडणी व वाहतूक यंत्रणेसह कारखान्याशी निगडीत सर्व घटकांच्या हिताचा, उत्कर्षाचा विचार नेहमी केला आहे.शेतकरी विकासाचा केंद्रस्थानी ठेवून प्रगती साधली जात आहे.यावेळी वैद्यकीय अधिकारी विक्रमसिंह गावडे यांनी स्वागत केले.सेवा सदन हॉस्पिटल, सांगली, दृष्टी हॉस्पिटल इस्लामपूर, महालॅब इस्लामपूर यांनी तपासणीचे काम पाहिले.सचिव सचिन पाटील, व्यवस्थापक दीपक पाटील, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, विश्वास साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष टी.एम.साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजयराव देशमुख आदी उपस्थित होते.