शेतकऱ्यांसाठी आडसाली ऊस लागवड फायद्याची :शास्त्रज्ञ सुरेश माने

पुणे: राज्यात १५ जून ते १५ जुलै या हंगामात करण्यात येणारी आडसाली ऊस लागवड ही शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरते. आडसाली उसाची लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ३१ मे अखेर जमिनीची मशागत पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.कारण जून ते जुलै या महिन्यामध्ये हवामान आर्द्रता जास्त असते.हंगामात शेतकऱ्यांना एकरी १०० टन ऊस उत्पादन घेता येते, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरीचे माजी शास्त्रज्ञ सुरेश माने यांनी केले.बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ व माळेगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी आणि नेचर केअर फर्टि प्रा.लि.च्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऊस परिसंवादात माने बोलत होते.

माने यांनी सांगितले की, ऊस लागवडीकरिता तीन हंगाम आहेत. १५ सप्टेंबर ते १५ डिसेंबर या महिन्यांत करण्यात येणारी ऊस लागवड महत्त्वाची ठरते.या महिन्यांमध्ये पोषक वातावरण असते.परतीच्या पावसाचा फायदा ऊस पिकाला मिळतो आणि सरासरी एकरी ८० ते ७५ टन उत्पादन शेतकरी घेऊ शकतात.माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे, मार्केट कमिटीचे माजी चेअरमन रमेशराव गोफणे, माजी संचालक शशिकांत तावरे, निशिगंध तावरे, संपतराव लोणकर, विकास तावरे, प्रवीण वाघमोडे, सुभाष तावरे, शिवाजी जाधवराव, संतोष तावरे आदी उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष निशिगंध तावरे यांनी प्रास्ताविक केले.उपाध्यक्ष विजय भोसले यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here