भविष्यात बीट देखील इथेनॉल उत्पादनासाठी उसाला पूरक पर्याय असेल: समीर सोमय्या

नवी दिल्ली: गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडचे सीएमडी समीर सोमय्या यांनी 64 व्या ISO परिषदेमध्ये ‘विविधतेद्वारे शाश्वतता’ या विषयावरील सत्राचे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी साखर उद्योगासाठी धोरणे आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन याची मांडणी केली. इथेनॉलच्या मिश्रणावर बोलताना ते म्हणाले, पाच-सहा वर्षांपूर्वी जेव्हा आपण 2 टक्के मिश्रण करत होतो, तेव्हा जगाने आपल्या 20 टक्के मिश्रणाच्या उद्दिष्टाला वेडेपणा ठरवले होते आणि हे लक्ष्य भारताला गाठता येणे शक्य नसल्याचेही म्हटले होते. मात्र, एक महिन्यापूर्वीच आम्ही 15 टक्के मिश्रणाचे लक्ष्य गाठले आहे. आता जगाला धक्का बसला आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी उसाबरोबरच धान्याचा वापर केला जाणार आहे.

गोदावरी सीएमडी सोमय्या म्हणाले, कमी ऊस क्षेत्रात जादा साखर कारखाने कार्यरत आहेत. त्यामुळे आता एकाच कारखान्यात उसाबरोबरच आम्ही धान्य देखील तयार वापरू शकतो. मला वाटते की जसे जसे आपण पुढे जाऊ, तसतसे इतर पिके असतील ज्यावर आपण काम करू शकतो. माझी स्वतःची कंपनी देखील ट्रॉपिकल शुगर बीटवर काम करत आहे.’गोदावरी’चे सीएमडी सोमय्या म्हणाले, पंजाबमधील एक मिल बीटवर खूप चांगले काम करत आहे. त्यामुळे बीट देखील उसावर आधारित इथेनॉलसाठी एक पूरक स्त्रोत निर्माण होण्याची शक्यता प्रबळ बनली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here